ईशान्य भागात ३ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान, तर उर्वरित भागात मतदानाची इतकी आकडेवारी

नवी दिल्ली – १७ वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघात मतदान होत आहे.

महाराष्ट्रातील नागपूर लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत मतदान ३८.३५% मतदानाची नोंद झाली आहे. तर तेलंगणा राज्यात ४८.९५ % मतदान आतापर्यंत झाले आहे.

जम्मू-काश्मीर (जम्मू आणि बारामुल्ला लोकसभा मतदार संघ) मध्ये दुपारच्या १ वाजेपर्यंत ३५.५२% मतदानाची नोंद झाली आहे. तर देशाच्या ईशान्य भागातील सिक्किम मध्ये ३९.०८ % मतदान आणि मिझोराम लोकसभा मतदारसंघात ४६.५% झाले आहे. तर मणिपूरमध्ये ३ वाजेपर्यंत ६८.९० % मतदान झाले आहे. नागालँडमध्ये ६८%, आसाममध्ये ५९.५% आणि मेघालयमध्ये ५५% मतदानाची नोंद ३ वाजेपर्यंत झाली आहे.

बिहार राज्यातील औरंगाबादमध्ये ३४.६०% मतदान झाले असून, गया मध्ये ३३%, नवाडा मधील ३७% आणि जमुईमध्ये २९% मतदान १ वाजेपर्यंत झाले आहे.

कोन्द्र शासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये  ३ वाजेपर्यंत मतदार ५१.२५% मतदान झाले असून, देवभूमी उत्तराखंडमध्ये ४६.५९% मतदान झाले आहे.

तर सर्वाधिक खासदार असलेल्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये ३ वाजेपर्यंत ५०.८६ मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.