‘बिग बी’च्या घराबाहेर “किंग खान’ रात्रभर उभा

शाहरुख खान गेल्या दशकभरापासून अमिताभ बच्चनची कॉपी करत आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे. अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या “डॉन’चे रिमेक, कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन आणि अमिताभ यांच्याबरोबरच्या सिनेमांमध्ये जास्तीत जास्त फुटेज खाण्यामुळे शाहरुख एकेकाळी अमिताभ बच्चन यांचा छोटा अवतार बनण्याची स्वप्ने बघायला लागला होता. मात्र आता बिग बी शाहरुखवर असे नाराज झाले आहेत की शाहरुखला अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर रात्रभर उभे राहण्याची वेळ आली आहे. स्वतः शाहरुख खानने ही माहिती सांगितलेली आहे.

त्याचे झाले असे की शाहरुख खानच्या होम प्रॉडक्‍शनचा सिनेमा असलेल्या “बदला’ने बॉक्‍स ऑफिसवर चांगला रिझल्ट दिला आहे. अमिताभ आणि तापसी पन्नू यांचे लीड रोल असणाऱ्या या सिनेमाच्या यशाबद्दल शाहरुख खानने एक पार्टी द्यावी अशी अमिताभ बच्चन यांची अपेक्षा होती. एरवी छोट्या मोट्या कारणासाठीही पार्टी देणाऱ्या शाहरुख खानने “बदला’च्या यशाबाबत पार्टी दिली नाही, याचे बच्चन यांना आश्‍चर्य वाटले. त्यांनी तशी तक्रारही शाहरुखकडे केली. शाहरुख “बदला’च्या यशाकडे डोळेझाक करतो आहे, असा सरळ सरळ आरोपच बच्चन यांनी केला.

गंम्मत म्हणजे बच्चन यांनी आपली ही तक्रार थेट शाहरुखकडे न करता, ट्‌विटरवर पोस्ट केली. त्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे, हे सगळ्या जगाला समजले. त्यावर सावरासावर करण्याची जबाबदारी शाहरुखकडे आली. त्याने पार्टीची जबाबदारी बच्चन यांच्यावरच टाकली. “सर तुम्ही पार्टी कधी देणार, याचीच आम्ही वाट बघत बसलो आहोत. जलसाच्या बाहेर आम्ही रात्रभर ताटकळत बसलो आहोत.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.