अमेठी – अमेठी या प्रतिष्ठीत मतदार संघात भाजपच्या उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या यावेळी पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत. त्या येत्या 11 एप्रिलला आपला अर्ज दाखल करणार आहेत. या आधी त्यांनी 17 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली होती पण त्या दिवशी सरकारी सुट्टी असल्याने त्यांनी 11 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याचे ठरवले आहे.
यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, भाजपचे या मतदार संघातील प्रमुख मोहसीन रझा आणि अन्य भाजप नेते उपस्थित राहणार आहेत. गौरीगंज कलेक्टर कचेरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी त्या बुधन माई मंदिरात जाऊन पुजा करणार आहेत. त्यांचे येथील प्रमुख प्रतिस्पधी आणि या मतदार संघातील विद्यमान खासदार राहुल गांधी हे बुधवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत. अमेठीत 6 मे रोजी मतदान होणार आहे.