पेपर फुटीचे प्रकरण : सुप्रिम कोर्टाने मागवला सीबीआयकडून तपास अहवाल

नवी दिल्ली – सन 2017 साली एसएससी परिक्षेचे पेपरफुटीचे जे प्रकरण घडले होते त्याच्या तपासाचा अहवाल आणि केस डायरी सादर करण्याची सुचना सर्वोच्च न्यायालयाने आज सीबीआयला केली आहे. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज हा आदेश दिला त्याची पुढील सुनावणी 11 एप्रिल रोजी होणार आहे.

पेपरफुटीच्या प्रकरणानंतर या पेपरची मार्च 2018 मध्ये फेर परिक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहींर करण्यावर न्यायालयाची कोणतीही आडकाठी नाही असेही यावेळी कोर्टाने स्पष्ट केले आहे. संस्थेतील कोणीतरी भ्रष्ट आहे म्हणून त्याचा फटका लाखो बेरोजगार युवकांना बसताकामा नये अशी भूमिकाही कोर्टाने मांडली आहे. स्टाफ सिलेक्‍शन कमिशनच्या म्हणजेच एसएससीच्या पेपरफुटीचे हे प्रकरण देशभर गाजल होते. त्याची सध्या सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.