Lok Sabha Elections Date। देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. तर काही दिवसापूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अनूप चंद्र पांडे गेल्या महिन्यात निवृत्त झाले होते. त्यानंतर आता दोन निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त आहेत. आता या पदांवर नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 15 मार्च रोजी बैठक होऊ शकते.
निवडणूक आयुक्तांची रिक्त पदे भरण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता बैठक होणार आहे. म्हणजेच १५ मार्चनंतरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. 15 मार्च रोजी निवड समितीची बैठक होणार असून निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीसाठी नावांना अंतिम रूप दिले जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आणि कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करून तशी घोषणा केली.
१५ मार्चनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार Lok Sabha Elections Date।
आता निवडणूक आयोग 2 निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीनंतरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकेल. मात्र, यावेळीही 2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे 7 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पहिल्या टप्प्यातील मतदान एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते.
सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे पथक सध्या अनेक राज्यांच्या दौऱ्यावर आहे. 13 मार्चपर्यंत निवडणूक अधिकारी आपला दौरा पूर्ण करतील. दरम्यान, निवडणूक आयोग सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेत आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्ष आणि भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलीय.
एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो Lok Sabha Elections Date।
आगामी लोकसभा निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. निवडणूक आयोग देखील एक विभाग तयार करत आहे. जो सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती ओळखून काढून टाकेल. त्यामुळे आयोगाचे काम आणखी सोपे होणार असल्याचे म्हटले जात आहे.