Palak Tiwari and Ibrahim Ali Khan| अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने देखील आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. पलकने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून पलक आणि अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगलेल्या आहेत. यातच आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाल्याने त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पलक आणि इब्राहिम एकाच कारमध्ये दिसत आहेत. यावेळी इब्राहिम कार ड्राईव्ह करताना दिसतोय तर पलक त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेली दिसत आहे. त्यानंतर दोघेही गाडीतून उतरून निघून जातात. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटींगच्या बातम्या समोर येत आहेत.
View this post on Instagram
पलक आणि इब्राहिम अनेकदा एकत्र सिनेमा बघायला जातात तर अनेकदा हे दोघं एकमेकांचे केवळ चांगले मित्र असल्याचंही बोललं जातं. मात्र अद्याप इब्राहिम आणि पलकने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पलक तिवारी ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. याआधी पलक हार्डी संधूसोबत बिजली या म्यूझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. तिचं हे गाणं सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं. त्यानंतर इब्राहिम अली खानही लवकरच बोमन ईरानीचा मुलगा कोयोज ईरानीच्या ‘सरजमीन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.