बारामती : राज्यसभेच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आता लोकसभेसाठी तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्याकडून कोणता उमेदवार दिला जाणार याची चर्चा रंगली होती.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या. आता बारामतीत लोकसभेला सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कामाचा आढावा सांगणारा प्रचार रथ फिरू लागला आहे.