North Korea – उत्तर कोरियाने पुन्हा एकदा रणगाडाभेदी क्षेपणास्त्र अर्थात बॅलेस्टिक मोसाईल डागले आहे. यासंदर्भात जपानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, दक्षिण कोरियाने या प्रक्षेपणाला दुजोरा देत रविवारी सकाळी क्षेपणास्त्र डागल्याचे सांगितले. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र सोडल्याचेही आढळून आले आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्र ह्वासोंग-१८ च्या चाचणीनंतर उत्तर कोरियाने केलेले हे पहिलेच क्षेपणास्त्र प्रक्षेपण आहे.
ह्वासोंग-१८ ची चाचणी १८ डिसेंबर रोजी करण्यात आली. हुकूमशहा किम जोंग-उन यांच्या नेतृत्वाखाली हे आधुनिक क्षेपणास्त्र अमेरिकेला लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणाव याआधी मोठ्या प्रमाणात वाढला होता. या वर्षी जानेवारी महिन्यात उत्तर कोरियाने २०० हून अधिक तोफा डागल्या होत्या. दोन कोरियांमधील वास्तविक सागरी सीमा नॉर्दर्न लिमिट लाइनच्या उत्तरेला हे तोफगोळे पडले.
मात्र, कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नाही. आता उत्तर कोरियाच्या आक्रमकतेमुळे पुन्हा दोन्ही देशांमध्ये विध्वंसाची नांदी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.