नवी दिल्ली – गेल्या १० वर्षांत महागाई आणि महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला मोर्चाच्यावतीने सोमवारी केंद्र सरकारच्या विरोधात जंतर मंतर येथे निदर्शने करण्यात आली.
बॅनर फडकवत तसेच घोषणा देत अनेक महिला काँग्रेस नेत्या आणि कार्यकर्त्यांनी जंतरमंतरवर ‘संसद घेराव’ आंदोलनात एकत्र येऊन केंद्राच्या विरोधात निदर्शने केली.
नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशात अभूतपूर्व महागाई आणि महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत असे एका नेत्याने नमूद केले.
महिला काँग्रेसच्या कार्यवाहक अध्यक्ष नेट्टा डिसोझा आणि दिल्ली काँग्रेसच्या महिला विभाग प्रमुख अमृता धवन यांच्यासह नेत्या या आंदोलनाला उपस्थित होत्या. दिल्ली परिसरातील अनेक महिलांनीही यावेळी आंदोलनात आपले योगदान दिले.