Pro Kabaddi League 2023 : प्रो कबड्डी लीगचा 10वा हंगाम, भारतातील दुसरी सर्वात मोठी लीग, 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि लीग टप्प्यातील शेवटचा सामना 21 फेब्रुवारी 2024 रोजी खेळवला जाईल. यावेळी PKL खूप खास असणार आहे आणि 4 वर्षांनंतर 12 वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने आयोजित केले जाणार आहेत. PKL ची सुरुवात 2014 साली झाली आणि गेल्या 9 वर्षात अनेक खेळाडूंनी आपले नाव कमावले आहे.
प्रो कबड्डी लीगच्या 10व्या हंगामाला उद्यापासून म्हणजेच 2 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गुजरात जायंट्स आणि तेलुगू टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबादमधील ‘द एरिना बाय ट्रान्सस्टेडिया’ येथे हा सामना होणार आहे. या मोसमात साखळी टप्प्यात 12 संघांमध्ये एकूण 132 सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा 2 डिसेंबरपासून सुरू होणार असून पुढील वर्षी 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. म्हणजे तीन महिने या स्पर्धेचा चाहत्यांना आनंद घेता येणार आहे. हे सर्व सामने 12 शहरांमध्ये खेळवले जातील. सर्व संघ प्रत्येक शहरात 6-6 दिवस राहणार आहेत. त्यानंतर हा ताफा (स्पर्धा) पुढे-पुढे जात राहिल.
प्रो कबड्डी 2023 बद्दल बोलायचे तर, यावेळी लीग स्टेजचे सामने अहमदाबाद (2-7 डिसेंबर), बेंगळुरू (8-13 डिसेंबर), पुणे (15-20 डिसेंबर), चेन्नई (22-27 डिसेंबर), नोएडा (29 डिसेंबर 2023-3 जानेवारी 2024), मुंबई (5-10 जानेवारी) , जयपूर (12-17 जानेवारी), हैदराबाद (19-24 जानेवारी), पाटणा (26-31 जानेवारी), दिल्ली (2-7 फेब्रुवारी), कोलकाता (9-14 फेब्रुवारी) आणि पंचकुला (16-21 फेब्रुवारी) येथे खेळले जाणार आहेत.
पहिले 6 दिवस अहमदाबादमध्ये सामने खेळवले जातील आणि नंतर बेंगळुरू, पुणे, चेन्नई, नोएडा, मुंबई, जयपूर, हैदराबाद, पाटणा आणि नंतर दिल्ली आणि कोलकाता मार्गे हा ताफा पंचकुला येथे पोहोचेल. साखळी सामन्यानंतर प्लेऑफ आणि फायनल लढती होतील, त्याचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.
अनूप कुमार, मनजीत छिल्लर, अजय ठाकूर, राहुल चौधरी, परदीप नरवाल, पवन कुमार सेहरावत, नवीन कुमार, अर्जुन देशवाल, संदीप नरवाल, नितेश कुमार, सिद्धार्थ देसाई, मनिंदर सिंग, रिशांक देवाडिगा, सुमित संगवान, सुनील कुमार, अस्लम इनामदार हे असे खेळाडू आहेत ज्यांनी जबरदस्त कामगिरी करून स्वतःचे नाव कमावले आहे. केवळ भारतीय खेळाडूच नाही तर फझेल अत्राचली, मोहम्मद इस्माईल नबीबक्ष, जंग कुन ली, मिराज शेख, मोहम्मदरेझा शादलू, रेझा मीरबाघेरी यांसारखे अनेक परदेशी खेळाडूही आहेत ज्यांनी पीकेएलद्वारे आपला ठसा उमटवला आहे.
सामन्यांची वेळ काय असेल?
यावेळी एका दिवसात दोनपेक्षा जास्त सामने खेळवले जाणार नाहीत. ज्या दिवशी दोन (Pro Kabaddi 2023 complete schedule) सामने होणार आहेत, त्या दिवशी पहिला सामना रात्री 8 वाजता सुरू होईल आणि दुसरा सामना रात्री 9 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ज्या दिवशी एक सामना खेळायचा आहे, तो सामना 9 वाजता सुरू होईल. तसे, बहुतेक दिवशी दोन सामने खेळले जातील. दर सहा दिवसांनी विश्रांतीचा दिवस असेल. कारण सर्व संघ एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणार आहेत.
प्रो कबड्डी लीग (PKL) 10 व्या हंगामाचे पूर्ण वेळापत्रक…
Pro Kabaddi League 2023 : अहमदाबाद (2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2023)
2 डिसेंबर 2023
1- गुजरात जायंट्स विरुद्ध तेलुगु टाइटंस
2- यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धाज
3 डिसेंबर 2023
3- तमिल थलाइवाज विरुद्ध दबंग दिल्ली केसी
4- गुजरात जायंट्स विरुद्ध बेंगलुरु बुल्स
4 डिसेंबर 2023
5- पुनेरी पलटन विरुद्ध जयपुर पिंक पैंथर्स
6- बेंगलुरु बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स
5 डिसेंबर
7- गुजरात जायंट्स विरुद्ध यू मुंबा
6 डिसेंबर
8- तेलुगु टाइटंस विरुद्ध पटना पाइरेट्स
9- यूपी योद्धाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
7 डिसेंबर
10- बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपुर पिंक पैंथर्स
11- गुजरात जायंट्स विरुद्ध पटना पाइरेट्स
Pro Kabaddi League 2023 : बेंगळुरू (8 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2023)
8 डिसेंबर
12- बेंगळुरू बुल्स विरुद्ध दबंग दिल्ली केसी
13- पुणेरी पलटण विरुद्ध यू मुंबा
9 डिसेंबर
14- बेंगळुरू बुल्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
15- यूपी योद्धा विरुद्ध तेलुगु टायटन्स
10 डिसेंबर
16- बंगाल वॉरियर्स विरुद्ध तामिळ थलायवास
17- दबंग दिल्ली केसी विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
11 डिसेंबर
18- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध गुजरात जायंट्स
19- बेंगळुरू बुल्स विरुद्ध यूपी योद्धा
12 डिसेंबर
20- बंगाल वॉरियर्स विरुद्ध पाटणा पायरेट्स
13 डिसेंबर
21- तमिळ थलायवास विरुद्ध तेलुगु टायटन्स
22- बेंगळुरू बुल्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
Pro Kabaddi League 2023 : पुणे (15 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023)
15 डिसेंबर
23- पुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
24- यू मुंबा विरुद्ध पाटणा पायरेट्स
16 डिसेंबर
25- पुणेरी पलटण विरुद्ध बंगाल वॉरियर्स
26- तेलुगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली के.सी
17 डिसेंबर
27- पाटणा पायरेट्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
28- यू मुंबा विरुद्ध तामिळ थलायवास
18 डिसेंबर
29- बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा
30- पुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्ली के.सी
19 डिसेंबर
31- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध गुजरात जायंट्स
20 डिसेंबर
32- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यूपी योद्धा
33- पुणेरी पलटण विरुद्ध बेंगळुरू बुल्स
Pro Kabaddi League 2023 : चेन्नई (22 डिसेंबर ते 27 डिसेंबर)
22 डिसेंबर
34- तमिळ थलायवास विरुद्ध पटना पायरेट्स
35- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध तेलुगु टायटन्स
23 डिसेंबर
36- तमिळ थलायवास विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
37- गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी योद्धा
24 डिसेंबर
38- यू मुंबा विरुद्ध बंगाल वॉरियर्स
39- बेंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स
25 डिसेंबर
40- बंगाल वॉरियर्स विरुद्ध दबंग दिल्ली के.सी
41- तमिळ थलैवास विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
26 डिसेंबर
42- पुणेरी पलटण विरुद्ध पाटणा पायरेट्स
27 डिसेंबर
43- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्ली के.सी
44- तमिळ थलायवास विरुद्ध गुजरात जायंट्स
Pro Kabaddi League 2023 : यूपी (29 डिसेंबर ते 3 जानेवारी 2024)
29 डिसेंबर
45- पटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
46- यूपी योद्धा विरुद्ध बेंगळुरू बुल्स
30 डिसेंबर
47- तेलुगु टायटन्स विरुद्ध यू मुंबा
48- यूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्ली के.सी
31 डिसेंबर
49- गुजरात जायंट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स
50- तमिळ थलायवास विरुद्ध बेंगळुरू बुल्स
1 जानेवारी
५१ – तेलुगू टायटन्स विरुद्ध पुणेरी पलटण
52- यूपी योद्धा विरुद्ध पाटणा पायरेट्स
2 जानेवारी
53- गुजरात जायंट्स विरुद्ध दबंग दिल्ली के.सी
3 जानेवारी
54- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
55- यूपी योद्धा विरुद्ध पुणेरी पलटण
Pro Kabaddi League 2023 : मुंबई (5 जानेवारी ते 10 जानेवारी)
5 जानेवारी
56- पटना पायरेट्स विरुद्ध दबंग दिल्ली के.सी
57- यू मुंबा विरुद्ध बेंगळुरू बुल्स
6 जानेवारी
58- यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
59- तेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्स
7 जानेवारी
60- पुणेरी पलटण विरुद्ध तामिळ थलायवास
61- बंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
8 जानेवारी
62- बेंगळुरू बुल्स विरुद्ध पाटणा पायरेट्स
63- यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली के.सी
9 जानेवारी
64- तेलुगू टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स
10 जानेवारी
65- यूपी योद्धा विरुद्ध तामिळ थलैवास
66- यू मुंबा विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
Pro Kabaddi League 2023 : जयपूर (12 जानेवारी ते 17 जानेवारी)
12 जानेवारी
67- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगु टायटन्स
68- पुणेरी पलटण विरुद्ध गुजरात जायंट्स
13 जानेवारी
69- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटण
70- यूपी योद्धा विरुद्ध बंगाल वॉरियर्स
14 जानेवारी
71- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध तामिळ थलायवास
72- दबंग दिल्ली केसी विरुद्ध पाटणा पायरेट्स
15 जानेवारी
73- बंगाल वॉरियर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स
74- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यू मुंबा
16 जानेवारी
75- पटना पायरेट्स विरुद्ध तामिळ थलायवास
17 जानेवारी
76- दबंग दिल्ली केसी विरुद्ध गुजरात जायंट्स
77- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
Pro Kabaddi League 2023 : हैदराबाद (19 जानेवारी ते 24 जानेवारी)
19 जानेवारी
78- पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा
79- तेलुगु टायटन्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स
20 जानेवारी
80- दबंग दिल्ली केसी विरुद्ध यू मुंबा
81- तेलुगू टायटन्स विरुद्ध यूपी योद्धा
21 जानेवारी
82- गुजरात जायंट्स विरुद्ध पुणेरी पलटण
83- बेंगळुरू बुल्स विरुद्ध तामिळ थलायवास
22 जानेवारी
84- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स
85- तेलुगु टायटन्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
23 जानेवारी
86- यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण
24 जानेवारी
87- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध दबंग दिल्ली के.सी
88- तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवास
Pro Kabaddi League 2023 : पाटणा (26 जानेवारी ते 31 जानेवारी)
26 जानेवारी
89- पाटणा पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स
90- यू मुंबा विरुद्ध गुजरात जायंट्स
27 जानेवारी
91- पाटणा पायरेट्स विरुद्ध पुणेरी पलटण
92- दबंग दिल्ली केसी विरुद्ध यूपी योद्धा
28 जानेवारी
93- तमिळ थलायवास विरुद्ध यू मुंबा
94- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स
29 जानेवारी
95- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स
96- पाटणा पायरेट्स विरुद्ध गुजरात जायंट्स
30 जानेवारी
97- पुणेरी पलटण विरुद्ध तेलुगु टायटन्स
31 जानेवारी
98- जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तामिळ थलायवास
99- पाटणा पायरेट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स
Pro Kabaddi League 2023 : दिल्ली (2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी)
2 फेब्रुवारी
100- दबंग दिल्ली केसी विरुद्ध बंगाल वॉरियर्स
101- गुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स
3 फेब्रुवारी
102- यूपी योद्धा विरुद्ध यू मुंबा
103- दबंग दिल्ली केसी विरुद्ध तेलुगू टायटन्स
4 फेब्रुवारी
104- गुजरात जायंट्स विरुद्ध तामिळ थलायवास
105- बेंगळुरू बुल्स विरुद्ध यू मुंबा
5 फेब्रुवारी
106- जयपूर पिंक पँथर्स पटना पायरेट्स
107- दबंग दिल्ली केसी विरुद्ध पुणेरी पलटण
6 फेब्रुवारी
108- तमिळ थलैवास विरुद्ध यूपी योद्धा
7 फेब्रुवारी
109- बेंगळुरू बुल्स विरुद्ध पुणेरी पलटण
110- दबंग दिल्ली केसी विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
Pro Kabaddi League 2023 : कोलकाता (9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी)
9 फेब्रुवारी
111- बंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स
112- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धा
10 फेब्रुवारी
113- पटना पायरेट्स विरुद्ध यू मुंबा
114- बंगाल वॉरियर्स विरुद्ध तेलुगू टायटन्स
11 फेब्रुवारी
115- तमिळ थलैवास विरुद्ध पुणेरी पलटन
116- बेंगळुरू बुल्स विरुद्ध गुजरात जायंट्स
12 फेब्रुवारी
117- यूपी योद्धा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
118- बंगाल वॉरियर्स विरुद्ध यू मुंबा
13 फेब्रुवारी
119- पटना पायरेट्स विरुद्ध तेलुगू टायटन्स
14 फेब्रुवारी
120- दबंग दिल्ली केसी विरुद्ध तामिळ थलैवास
121 – बंगाल वॉरियर्स विरुद्ध पुणेरी पलटण
Pro Kabaddi League 2023 : पंचकुला (16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी)
16 फेब्रुवारी
122- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पटना पायरेट्स
123- तेलुगु टायटन्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
17 फेब्रुवारी
124- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुंबा
125- यूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्स
18 फेब्रुवारी
126- तमिळ थलैवास विरुद्ध बंगाल वॉरियर्स
127- दबंग दिल्ली केसी विरुद्ध बेंगळुरू बुल्स
19 फेब्रुवारी
128- गुजरात जायंट्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स
129- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पलटण
20 फेब्रुवारी
130- यू मुंबा विरुद्ध तेलुगु टायटन्स
21 फेब्रुवारी
131 – पुणेरी पलटण विरुद्ध यूपी योद्धा
132- हरियाणा स्टीलर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स
तुम्ही थेट सामना कुठे पाहू शकाल..?
कबड्डीप्रेमींना हे सामने केवळ स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचा विकल्प तर आहे. पण ते घरबसल्या टीव्ही आणि अॅपवरही थेट लाईव्ह सामने पाहू शकणार आहेत. प्रो कबड्डी सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर केले जाईल. त्याच वेळी, थेट प्रक्षेपण(लाइव स्ट्रीमिंग) डिस्ने + हॉट स्टार वर उपलब्ध असेल.