न्यूयॉर्क : एलॉन मस्क यांनी ट्विटरचे मालकी हक्क मिळवल्यानंतर त्यात रोज नवनवीन बदल होताना पाहायला मिळत आहेत. अलीकडेच ट्विटरचे नाव बदलून ‘X’ केले आहे. त्यातच ट्विटरच्या ब्लू बर्डलाही रामराम केला आहे. दरम्यान, आता कंपनीने आणखी एक मोठा बदल जाहीर केला आहे.
ट्विटरचे लोकप्रिय ट्विट बटण आता पोस्ट केले आहे. त्याच वेळी, यूजर्स आता रीट्विटच्या जागी रिपोस्ट हा पर्याय वापरू शकणार आहेत. एक्स न्यूज डेलीनुसार, नवा बदल नुकताच Android साठी बीटा व्हर्जनमध्ये करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
Twitter’s signature “Retweet” is now replaced with “Repost” button.
The end of an Era!#Twitter #X pic.twitter.com/iP7Ox2LVxQ
— Fact Protocol (@FactProtocol) August 2, 2023
एलॉन मस्क यांनी नुकताच हा बदल ट्विटरवर केला आहे. त्यामुळे नवीन बदलानुसार आता ट्विटरचा वापर करणाऱ्या यूजर्सना Retweet च्या जागी Repost हे बटण दिसणार आहे. गेल्या सोमवारी, ट्विटरने आपल्या नवीन लोगोचे अनावरण केले होते. यात ब्लू बर्डच्या जागी X हे चिन्ह आहे.
नवीन लोगोमध्ये काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा X आहे. मस्कने पोस्ट्सच्या सीरिजमध्ये ट्विटरचे रीब्रँड करण्याची योजना जाहीर केल्यानंतर हा बदल झाला आहे. तेव्हा त्यांनी ट्विटरच्या ब्लू बर्डबद्दल यूजर्सना कल्पना दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी ट्विटरची ब्लू चिमणी काढण्यात आली आणि त्या जागी एक्स (X) हे चिन्ह आलं.