मेलबर्न – ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार टीम पेनी याने शुक्रवारी निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने 2018 ते 2021 या कालावधीत 35 कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना 23 सामन्यांत संघाचे नेतृत्वही केले होते.
शुक्रवारी देशांतर्गत शेफील्ड शील्ड स्पर्धेत टास्मानिया विरुद्ध क्विन्सलॅंड यांच्यातील प्रथम श्रेणी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यानंतर पेनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण घडल्यावर स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद सोडावे लागले होते त्यानंतर पेनीकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते.
एका खेळाडूला वादग्रस्त संदेश पाठवल्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर पेनी याने ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोडले होते. पेनीने 35 एकदिवसीय सामन्यांतही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते.