मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी चित्रपट ‘पठाण’ चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगावरून वाद निर्माण झाला होता.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा चित्रपटाचा वाद वाढत चालला आहे. चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. त्याचवेळी विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची यांनी ट्विट करत, ‘पठाण हा चित्रपट या देशात प्रदर्शित होऊ देणार नाही आणि चालणार आहे.’ असं म्हटले आहे.
जो करना पड़ता है करो सनातनीयों अब पठान फिल्म को किसी भी हालत में चलने नहीं देना हैं पूरे भारत में…
— Dr. Prachi Sadhvi (@Sadhvi_prachi) January 18, 2023
VHP नेत्या साध्वी प्राची यांनी ट्विट केले की, तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. ‘सनातनी, आता पठाण चित्रपट भारतात कोणत्याही परिस्थितीत चालू देऊ नये.’ शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबद्दल साध्वी प्राचीने ट्विट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी साध्वी प्राची यांनी ट्विट करून माझ्यासह पठाणवर कोण बहिष्कार घालत आहे, असा सवाल केला होता.
पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. पठाण हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित होत आहे