मुंबई – काही दिवसांपूर्वीच अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या बहुचर्चित ‘आरआरआर या ऐतिहासिक चित्रपटातील ‘नाटु नाटु’ या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. या लोकप्रिय तेलुगू चित्रपटाच्या गाण्याने अनेक हॉलिवूड गाण्यांना मागे टाकत हे नामांकन पटकावले. बाहुबली फेम एस एस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात बिग बजेट चित्रपट होता. जेव्हा पासून ‘आरआरआर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे, त्या दिवसापासूनच सगळीकडे या चित्रपटाचा बोलबाला दिसून येत आहे.
दरम्यान, अश्यातच आता या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांचं हे वक्तव्य सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. “आपल्या चित्रपटाला ऑस्कर मिळणारच..!’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरआरआर हा वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत होता.
राजामौली हे सध्या अमेरिकेमध्ये आऱआरआऱचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यावेळी ते म्हणाले, “माझा आरआऱआऱ हा चित्रपट ‘छेलो शो’ पेक्षा प्रेक्षकांना भावताना दिसत आहे. मी माझा चित्रपट आणखी ऑस्करच्या सदस्यांपर्यत पोहचवण्याचा पूर्णपणे प्रयत्नही करतो आहे. तेव्हा मला अशी आशा आहे की, येत्या काळात आरआरआरला ऑस्कर मिळेलच’ असा विश्वास यावेळी त्यांनी बोलताना दाखवला. जेव्हा पासून हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्ट लिस्ट झाला आहे, त्या दिवसापासूनच चित्रपटाचे चाहते त्याचा आनंद साजरा करत आहेत.