मनिला : जगातील अनेक देश सध्या वाढत्या महागाईशी झुंजत आहेत. महागाईची स्थिती अशी आहे की फिलिपाइन्समध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. फिलिपाइन्समध्ये चिकनपेक्षा कांदा तिप्पट महाग झाला आहे. येथे एक किलो कांदा 900 रुपयांना विकला जात आहे, तर एक किलो चिकनची किंमत 325 रुपये आहे. त्यामुळे फिलिपाइन्समध्ये कांद्याची तस्करी सुरू झाली आहे.
अलीकडेच चीनमधून तस्करी केलेल्या कांद्याची एक खेप फिलिपाइन्सच्या कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. हा कांदा चीनमधून पेस्ट्री बॉक्समध्ये लपवून भारतात नेला जात होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही कस्टम अधिकाऱ्यांनी कपड्यांच्या शिपमेंटमधून तस्करी होत असलेला सुमारे अडीच कोटी रुपयांचा कांदा जप्त केला होता.
फिलीपाईन्समध्ये गेल्या वर्षी अनेक वादळात कोट्यवधी रुपयांचे कांद्याचे पीक उध्वस्त झाले होते. त्यानंतर कांद्याचा तुटवडा निर्माण झाला. कांदा हा फिलिपाइन्सच्या लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील नागरिक दर महिन्याला सुमारे 20,000 मेट्रिक टन कांदा खातात. कांद्याची मागणी आणि पुरवठा कमी असल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत.
‘फार्म्युला-ई वर्ल्ड चॅम्पियनशिप’ हा आत्मनिर्भर भारतातील महत्त्वाचा उपक्रम – मुख्यमंत्री शिंदे
कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे फिलिपाइन्समध्ये महागाईचा दर 14 टक्क्यांवर पोहोचला आहे. तुटवडा लक्षात घेऊन फिलीपिन्स सरकारने 21 हजार टन कांदा आयात करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यानंतर फेब्रुवारीपासून कांद्याचे पीकही येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर देशात कांद्याचे भाव खाली येण्याची शक्यता आहे.