मुंबई – मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या जामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. गॅंगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथिदारांचा सहभाग असलेल्या जमीन खरेदी प्रकरणी मलिक यांनी कुर्ला येथे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत फेब्रुवारीत त्यांना अटक केली होती.
दरम्यान, मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यात इस्पितळात उपचार होत आहेत. याआधीही मलिकांचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला होता. मात्र आजच्या सुनावणीत त्यांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. का? पुन्हा मलिक यांची कोठडीत रवानगी होणार हा निर्णय आज होणार आहे.
मात्र, काही दिवसांपूर्वीच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाचा दिलासा मिळाला आणि ते घरी गेले. त्यामुळे सध्या मविआमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.