Maharashtra Board SSC Result 2024| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी (दि.२७) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाबाबत अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेली होती. अखेर निकाल जाहीर होण्यासाठी आता काही तासच शिल्लक राहिल्याने विद्यार्थांसह पालकांची देखील धाकधूक वाढली आहे.
राज्य मंडळाने २७ मे रोजी निकाल जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये निकाल जाहीर करण्याची परंपरा होती. यंदा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे बंधन घालण्यात आल्यामुळेच निकाल लवकर जाहीर होत आहे. १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात परीक्षेसाठी सुमारे १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. Maharashtra Board SSC Result 2024|
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
१. https://mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org
कसा पाहाल निकाल?
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
- होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचे लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचे नाव नोंदवा.
- स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईल.
- निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा प्रिंट आऊट घ्या.
- दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर त्याची छापील प्रत काही दिवसांनतर त्यांच्या संबंधित शाळांमध्ये उपलब्ध होईल. Maharashtra Board SSC Result 2024|
अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
दरम्यान, राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यातील नोंदणीला २४ मे रोजी सुरुवात झाली आहे. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दोन दिवसांत १४ हजार ५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य टप्पे जाहीर केले आहेत. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. प्रवेशासाठी पोर्टल सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग १ भरून अर्ज प्रमाणित करून घेण्यासाठी २४ मे पासून सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
हेही वाचा: