पुणे – राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफ यांचा पुण्यामध्ये सन्मान करण्यात आला. निमित्त होते सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले,अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेत असती तर आज मुख्यमंत्री असती. आपल्याकडे प्रतिमा जपल्या जातात परंतु प्रतिभा जपली जात नाही अशी खंत देखील यावेळी ठाकरेंनी व्यक्त केली.
कलाकारांचे महत्व काय असते हे परदेशात गेल्याशिवाय काळात नाही लिओवार्दी द विंचीच्या नावाने रोममध्ये विमानतळ आहे. आपल्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात असंही ठाकरे यावेळी म्हणाले. अशोक सराफ यांनी नाटक,सिरीयल आणि चित्रपटात काम केले आता फक्त ओटीटी प्लॅटफॉर्म राहिलाय. अशोक सराफ ही व्यक्ती आज दक्षिणेत असती तर आज ते मुख्यमंत्री असते तुमच्या ४० फुटांच्या कटाऊटवर दूध टाकले गेले असते असं स्पाष्ट मत यावेळी राज ठाकरे यांनी मांडलं.
प्रशांत दामले आणि अशोक सराफ हे माझे आवडीचे कलाकार आहेत. मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणस राहिलेली नाहीत त्यामुळे आमच्यावर आटोपाव लागत,तुम्ही युरोपमध्ये असता तर आज या व्यासपीठावर देशाचा पंतप्रधान तुमचा सत्कार करायला असता असाही ठाकरे यावेळी म्हणाले. अशोक सराफ यांच मूळ घराणं बेळगावातील असल्याचं आज मला कळलं,त्यांचा जन्म मुंबईचा त्यामुळे खरा सीमाप्रश्न त्यांनी सोडवलाय अशी मिश्किल टिपण्णी देखील यावेळी ठाकरेंनी केली.