पलामू (झारखंड) : पलामू जिल्ह्यातील हुसैनाबाद ब्लॉकमधील बनियाडीह भागात गुरुवारी सकाळी हत्तींच्या कळपाने हल्ला केला. यादरम्यान किशूनपूर गावात दोघांना जीव गमवावा (Elephants wreak havoc in Jharkhand’s Palamu)लागला.
सहाय्यक वनसंरक्षक रामसुरत प्रसाद यांनी सांगितले की, हत्तींच्या कळपाने हल्ला केलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. पहाटे 5 वाजता घडलेल्या या घटनेनंतर जखमी व्यक्तीला हुसैनाबाद उपविभागीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Lok Sabha : लवकरच महागाई आणखी नियंत्रणात येईल – अर्थमंत्री सीतारामन
मिळालेल्या माहितीनुसार, 12-15 हत्तींचा कळप गावात घुसला आणि कहर माजवू लागला. गावकऱ्यांनी हत्तींचा कळप गावातून हाकलण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी गावकऱ्यांवरच हल्ला केला. या घटनेत ग्रामस्थ वंशी महतो (40) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरे शेतकरी मनोज राम (45) यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. हत्तीच्या हल्ल्यात काही ग्रामस्थ जखमीही झाले आहेत.