वाल्हे – वागदरवाडी (ता.पुरंदर) हद्दीत रेल्वे अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अद्याप त्याची ओळख पटू शकली नाही, अशी माहिती वाल्हे दूरक्षेत्राच्या पोलिसांनी दिली.
वागदरवाडी हद्दीत मंगळवारी (दि. 29 नोव्हेंबर) रेल्वेच्या 68/8-9 कि.मी. पोल क्रमांकाजवळ 68/58 डाऊन ट्रॅकच्या बाजूला अंदाजे 40 ते 45 वयाच्या व्यक्तीचा रेल्वेची ठोस बसून मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले होते.
त्याने अंगात राखाडी रंगाचे जॅकेट व राखाडी रंगाची जीन्सची पॅन्ट घातली असल्याची फिर्याद देवेंद्रकुमार पटेल यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे दूरक्षेत्रातील पोलीस हवालदार घनश्याम चव्हाण तपास करीत आहेत.