Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आरोग्य जागर

मधुमेह उपचारांचा इतिहास

by प्रभात वृत्तसेवा
December 1, 2022 | 8:57 am
A A
मधुमेह उपचारांचा इतिहास

धुमेह हा काही हजार वर्षांपासून माहीत असलेला रोग आहे. आजपासून 3572 वर्षांपूर्वी (इ.स.पू. 1550) इजिप्त मधील “इबेर्स पापारयस’ नावाच्या ग्रंथात “ज्या रोगात खूप लघवी होते असा रोग’ असे याचे वर्णन आहे. त्याच काळात पुरातन लिखाणात या रोगाचा “मधुमेह’ असा उल्लेख केलेला सापडतो. या रोगाने बाधित रोगी, बहुतेक वेळा (बहुतेक वेळा मुले आणि तरुण) अनाकलनीय कारणाने, खंगत किंवा झिजत जाऊन मरत असत. हे खंगणे कितीही खायला दिले तरी थांबत नसे.

2272 वर्षांपूर्वी अपोलोनियस नावाच्या ग्रीक वैद्याने या रोगाला “डायबेटीस’ हे नाव दिले. अर्थ जुनाच, “खूप लघवी होणे’; पण आता त्याचे बारसे झाले. कुठल्याही रोगाला जर विशिष्ट नाव प्राप्त झाले तर सर्वांनाच बरे वाटते.
“अंगावर पुरळ उठले पण कारण कळत नाही’ असे डॉक्‍टरने सांगितले तर पेशंटला ते आवडणार नाही. डॉक्‍टरने निदान रोगाचा “डायग्नोसिस’ तरी करावा अशी पेशंटची अपेक्षा असते. डॉक्‍टर गंभीर चेहरा करून, विचार केल्याचे भासवून पेशंटला सांगतात; बहुतेक इडिओपॅथिक पर्प्यूरा असावा. हे ऐकून पेशंट “आयडेंटी क्रायसिस’ मधून बाहेर येतो.

खरेतर इडिओपॅथिकचा अर्थ “ज्याचे कारण माहीत नाही असा’ आणि पर्प्यूरा म्हणजे पुरळ. पण हे नाव कळले की पेशंटला फी दिल्याचे वाईट वाटत नाही. घरी जाऊन मला “इडियोपॅथिक पर्प्यूरा’ झाला आहे असे सांगून भाव खाता येतो. कुठच्याही रोगात काहीतरी पथ्य पाळण्याची प्रथा असते. डॉक्‍टर ही पथ्ये वगैरे नक्की काहीच ठाउक नसल्याने उगाच, लिंबू आणि डाळ खाऊ नका, शेपू पण नको असे काहीतरी पथ्य सांगतो. पेशंट अभिमानाने डॉक्‍टरनी मला शेपू ऍव्हॉइड करायला सांगितला आहे, असे सांगत फिरतो.

त्या बिचाऱ्या अपोलोनियसवर असाच प्रसंग ओढवला असावा. त्याने “डायबेटीस’ हे नाव दिले. अर्थ काही वेगळा नाही, पूर्वीचाच- जास्त लघवी होणे. त्यानंतर 1925 वर्षे उलटली. साल होत 1675. या काळात ब्रेनला इजा झाल्यानंतर डायबेटीसची लक्षणे दिसतात म्हणजे “खूप लघवी होते’ हे लक्षात आले होते. ही लघवी गोड नसते, हे ही लक्षात आले हेते. थॉमस विलीस नावाच्या डॉक्‍टरने ब्रेनला इजा होऊन जी लघवी होते ती गोड असते, ब्लॅंड असते; म्हणून त्याला “डायबेटीस इनसिपिडस’ हे नाव दिले आणि गोड लघवीला “मेलिटस’ म्हणजे मधासारखी असे नाव दिले. तेव्हा सन 1675 पासून “डायबेटीस मेलिटस’ हे नाव रूढ झाले.

सन 1776 साली मॅथ्यू डॉबसन नावाच्या इंग्रज डॉक्‍टरने लघवीचा गोडवा हा त्यातील “साखरे’ मुळे येतो हे सिद्ध केले. त्याच काळात रोग्याचे रक्‍तदेखील गोड असते हे कळून आले. रक्‍त आणि लघवी चवीला गोड असतात हे कसे शोधले ती कथा सांगत नाही.
सन 1797 पर्यंत डायबेटीसवर उपचार असा नव्हताच. डायबेटीसच्या लक्षणात काही सुधारणा दिसू शकतात ही शक्‍यता निर्माण केली ती जॉन रोलो नावाच्या स्कॉटिश डॉक्‍टरने. कार्बोहायड्रेट विरहीत फक्‍त मांसाहार केला तर डायबेटीसची लक्षणे सुधारू शकतात हे त्याने दाखवून दिले.

डायबेटीसवर काहीतरी उपचार होऊ शकतात, ही आशा जॉन रोलोने पल्लवित केली. 1870 सालच्या फ्रान्स-पर्शिया युद्धात अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागले. यातील अनेक डायबेटीसचे पेशंट होते त्यांच्या लक्षणात अचानक सुधारणा झाली. अपोलोनाइेर बुचारडाट या डॉक्‍टरने उपासमार आणि डायबेटीसमध्ये सुधारणा हे दोन बिंदू कनेक्‍ट केले. त्याने स्वत: साखर आणि पिष्टपदार्थ विरहीत डाएट ट्रीटमेंट म्हणून द्यायला सुरुवात केली. म्हणूनच त्याला “आधुनिक मधुमेह उपचार शास्त्राचा’ जनक म्हणतात.
अपोलोनाइेर बुचारडाट हे नाव उच्चारण्यास कठीण म्हणून त्याचा नामोल्लेख कुणी करीत नसावेत. 1889 साली जोसेफ वॉन मेरिंग आणि ऑस्कर मिन्कोवस्की यांनी पॅनक्रियाज काम करेनासे झाले तर डायबेटीस होतो हे दाखवून दिले. 1910 साली एडवर्ड शार्पी-शॅफर याने या पॅनक्रियाजमधील काही विशिष्ट पेशींची बेटं असतात. या इन्सुलामध्ये तयार होणाऱ्या हार्मोनच्या कमतरतेमुळे डायबेटीस होतो हे सिद्ध केले. या हार्मोनला “इन्सुलामधे तयार होते’ म्हणून इन्सुलिन हे नाव मिळाले.

डायबेटीसच्या ट्रीटमेंटची खरी सुरुवात केली ती फ्रेडरिक लन याने. तो म्हणतो, डायबेटीस हा आहारातील पिष्टपदार्थ हाताळताना थकलेल्या पॅनक्रियाजचा रोग आहे. त्याने 1000 कॅलरी डाएट विथ लेस दॅन 10 ग्रॅम कार्ब असा डाएट चालू केला. तो पेशंटना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून सकाळी सात ते रात्री सातपर्यंत फक्त कॉफी आणि माफक प्रमाणात व्हिस्की देत असे. युरीनमधून साखर वाहणे बंद झाले की पेशंट डिश्‍चार्ज घेई आणि ऍलन्स डाएट चालू ठेवी. हजारो लोकांना या पद्धतीने फायदा झाला.
त्यावेळेस टाइप 1 डायबेटीस आणि टाइप 2 डायबेटीस याची जाणीव नसल्याने अनेक टाइप वन डायबेटीस झालेले रुग्ण ऍडमिट होऊन, डाएट करीत आणि त्यांना काहीही फायदा होत नसल्याने ऍलनवर प्रचंड टीकाही होत होती.

डॉ. एलियट जॉस्लिनने ऍलनची पद्धती वापरून अनेकांचे प्राण वाचवले. त्याने टाइप 1 सारखी लक्षणे दिसल्यास “माझे उपचार तुझ्यासाठी नाहीत’ हे सांगून त्यांची बोळवण करी. त्यामुळे त्याचा सक्‍सेस रेट खूप चांगला होता. त्याने हार्वर्डमधून शिक्षण घेऊन पूर्ण लक्ष डायबेटीसवरील उपचारांवर केंद्रित केले. आजही हार्वर्डमधील “जॉस्लिन डायबेटीस क्‍लिनिक’ हे जगातील अग्रगण्य डायबेटीस उपचार आणि संशोधन केंद्र समजले जाते. त्याने लिहिलेले, “द ट्रीटमेंट ऑफ डायबेटिस मेलिटियस’ हे पुस्तक अनेक अवृत्ती आणि लेखक बदलूनही डायबेटीसचे बायबल समजले जाते आणि डॉ. जॉसलिन हा जगातील पहिला डायबेटीस स्पेशालिस्ट समजला जातो.
त्याने ऍलनची ट्रीटमेंट वापरून अनेक रुग्ण बरे झाल्यानंतर केलेले एक विधान फार प्रसिद्ध आहे. आम्ही डायबेटीस रिव्हर्सल साठी ते वाक्‍य पाया म्हणून वापरतो.

The temporary periods of under nutrition are helpful in the treatment of diabetes. Fasting will probably be acknowledged by all as treatment for diabetes after experiments i have conducted. मला डायबेटॉलॉजिस्ट म्हणून कुणी कधी गोत्र विचारलेच तर जॉस्लिन गोत्रोत्पन्न: नितीन शर्माहम्‌ । असेच म्हणावे लागेल.

मधुमेह अर्थात डायबेटीसवर काहीतरी उपचार होऊ शकतात, ही आशा जॉन रोलो या वैद्यकीयतज्ज्ञाने पल्लवित केली. अपोलोनाइेर बुचारडाट या डॉक्‍टरने स्वत: साखर आणि पिष्टपदार्थ विरहीत डाएट ट्रीटमेंट म्हणून द्यायला सुरवात केली. डायबेटीसच्या ट्रीटमेंटची खरी सुरवात केली ती फ्रेडरिक लन याने. डायबेटीसचा हा रंजक इतिहास आरोग्याच्या दृष्टीने जाणून घेऊया.

– डॉ. नितीन पाटणकर

Tags: aarogya newshelath newshelath tipsMAHARASHTRApune newstop news

शिफारस केलेल्या बातम्या

‘सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान’; सुधीर मुनगंटीवार
latest-news

‘सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान’; सुधीर मुनगंटीवार

6 hours ago
उत्रौलीत वयाच्या 79 व्या वर्षी फुलवली फळबाग; फळझाडांबरोबर विविध प्रकारची अंतरपिकांचाही समावेश
latest-news

उत्रौलीत वयाच्या 79 व्या वर्षी फुलवली फळबाग; फळझाडांबरोबर विविध प्रकारची अंतरपिकांचाही समावेश

7 hours ago
जागेच्या वादातून जेसीबीखाली चिरडण्याचा प्रयत्न
latest-news

खुनातील मुख्य साक्षीदारांचा खून करण्याचा कट पोलिसांनी उधळला; चौघे अटक, आणखी रडारवर….

7 hours ago
‘पठाण’ सिनेमानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली दणदणीत कमाई; आकडा ऐकून तुम्ही….
latest-news

‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर वेग मंदावला; जाणून घ्या, कारण….

7 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

PM Modi Foreign Visits : पाच वर्षांत पंतप्रधानांचे 21 परदेश दौरे; दौऱ्यांवर झाला ‘इतका’ खर्च

Vidarbha : अमरावती विद्यापीठाचा अतिरिक्त प्रभार डॉ. प्रमोद येवलेंकडे सुपूर्द

सरस्वती मंदिर संस्थेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

जाणून घ्या! हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींचे किती झाले नुकसान? आकडा वाचून व्हाल थक्क

मोठी बातमी: काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या पत्नीची साडेसहा कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

Most Popular Today

Tags: aarogya newshelath newshelath tipsMAHARASHTRApune newstop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!