औंध -पुण्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा महापौर होईल, तेव्हा पुण्यातील पिण्याच्या पाण्याचा, ट्रॅफिकचा आणि कचऱ्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवायचा आहे. यासाठी चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे. जो कष्ट करणारा, समस्यांची जाण, अभ्यासू असावा, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचे राहुल बालवडकर यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या की, बाणेर-बालेवाडीचा नियोजनबद्ध विकास यापूर्वीच अजित पवार व बाबुराव चांदेरे यांनी केला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने हा परिसर “स्मार्ट सिटी’मध्ये घेतला. परंतु, पाच वर्षांत शहराचे मोठे नुकसान झाले आहे, तो बदल आपल्याला घडवायचा आहे. बक्षिस वितरण सुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, कार्यक्रमाचे आयोजक राहुल बालवडकर, पीडीसीसी बॅंक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, महादेव कोंढरे, सायली वांजळे, समीर चांदेरे, नितीन कळमकर, गणपत बालवडकर, गणपत मुरकुटे, अविनाश कांबळे, मनोज बालवडकर, पूनम विशाल विधाते, सुषमा ताम्हाणे, राखी श्रीराव, नामदेवराव बालवडकर, अंकुशराव बालवडकर, ह.भ.प. संजय बालवडकर उपस्थित होते.
भरगच्च बक्षिसांचे वाटप…
स्पर्धेचे पारितोषिक विजेत्या महिलांना लकी ड्रॉ काढून (मोफत दुबई ट्रीप) तसेच 50 महिलांना लकी ड्रॉद्वारे पैठणी भेट देण्यात आली. होम मिनिस्टर मध्ये प्रथम क्रमांक (दुचाकी व पैठणी), द्वितीय क्रमांक (टीव्ही व पैठणी), तृतीय क्रमांक(फ्रिज व पैठणी), चतुर्थ क्रमांक (वॉशिंग मशीन व पैठणी) बक्षिसे देण्यात आली.