नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघात येण्यासाठी कोणते शुल्क लागत नाही. कोणीही संघात येऊ शकते. सगळ्यांचे पूर्वज समानच आहेत असे संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की 40 हजार वर्षांपूर्वी जो भारत होतो तो काबूच्या पश्चिमेपासून छिंदविन नदीच्या पूर्वपर्यंत आणि चीनच्या उतरंडीपासून श्रीलंकेच्या दक्षिणेपर्यंत जो मानव समूह आज आहे त्यांचा डिएनए 40 हजार वर्षांपासून एकसारखाच आहे. तेव्हापासूनच आपले पूर्वजही एक आहेत. पूर्वी इंग्लंडमध्ये चार भाषा बोलल्या जायच्या. आता एकच भाषा बोलली जाते.
संघाच्या विरोधात कोणीच कोणाला चिथावणी देऊ शकत नाही. बळजबरीने कोणती गोष्ट करायला लावल्याचा काहीच फायदा नसतो असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आपल्या देशात एक पूजा, एक भाषा आणि एक जाती असा प्रकार नाही. संघ सेवाकार्यात असून त्यात आमचा कोणता स्वार्थ नाही.
रामायण आणि महाभारतातही आपल्या देशाचा उल्लेख आहे. बाहेरून आक्रमणे झाली तरी आपण एक आहोत. अखंड भारतापासून तिबेटपर्यंतच्या लोकांचा डिएनए एकसमान आहे. कोणाच्या प्रार्थनेची पध्दती बदलण्याचा प्रयत्न करू नका असे विज्ञानही सांगते. आपण एरव्ही आपापसांत कितीही लढलो तरी संकटाच्या काळात एकत्र येतो. चार वेळा युध्द झाले त्यावेळीही आपण एकच होतो आणि संघाच्या शाखेतही कोणाची जात विचारली जात नाही.