आळंदी, – संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी आळंदी यात्रेनिमित्त आळंदी शहरात भाविक, दिंड्या येण्यास सुरुवात झाली आहे. आज मंगळवारी माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पहिल्या क्रमांकाची दिंडी “वासकर महाराज दिंडी” आळंदीत पोहोचली आहे. उद्या बुधवारी संत नामदेव महाराज तर गुरुवारी श्री पांडुरंगराय यांचा पालखी सोहळा अलंकापुरीत पोहोचणार आहे.
गुरुवारी सकाळी श्रीगुरु हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने मंदिरात समाधी सोहळा उत्सवाला सुरुवात होणार आहे. रविवारी (दि. 20) कार्तिकी एकादशी तर मंगळवार (दि. 22) माऊलींचा समाधी सोहळा आहे. यामुळे आळंदीत आता भाविक वारकरी पोहोचत असून ठिकठिकाणी राहुट्या, पाल उभारणे सुरु आहे. काही ठिकाणी सप्ताहांना सुरुवात झाली असून हरिनामाचा गरज ऐकू येत आहे.
माऊली मंदिरात उद्या (दि. 16) होणारे कार्यक्रम –
पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा, दुपारी 12.30 ते 1 श्रींना महानैवेद्य, सायंकाळी श्रींची दिंडी (श्रीगुरू हैबतरावबाबा दिंडी) पंढरपूरातून आगमन, नगर प्रदक्षिणा व हैबतबाबा ओवरीपुढे आरती. रात्री 8 ते 8.30 धुपारती. रात्री 9 ते 11 ह.भ.प. बाबासाहेब आजरेकर यांच्यातर्फे कीर्तन सेवा, रात्री 10 ते 12 हैबतबाबा पायरीपुढे वासकर महाराज यांच्यातर्फे जागर, रात्री 2 ते पहाटे 4 ह.भ.प हैबतबाबा आरफळकर यांच्यातरर्फे हैबतबाबांच्या पायरीपुढे जागर होईल.
हेही वाचा – कार्तिकी यात्रा 2022: वाहन पास घेण्यासाठी आळंदी पोलीस ठाण्यात गर्दी
हेही वाचा – अतिक्रमण कारवाईतील साहित्य परत मिळणार – मुख्याधिकारी अंकुश जाधव