मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पीएफआय या संघटना चांगलीच चर्चेत आली आहे. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयात हजर करण्याचा बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एका पदाधिकाऱ्याला एटीएसने ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला आज न्यायालयात हजार करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पीएफआयने बऱ्यापैकी हातपाय पसरले असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय तपास संस्था व एसटीएसने मागील महिन्यात देशभरात छापेमारी केल्यानंतर केंद्र सरकारने देखील गंभीर दखल घेत पीएफआय संघटनेवर बंदी घातली. त्यानंतर राज्यातील अनेक भागवुन देखील पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना एटीएसने ताब्यात घेतले. तर राज्यातील जिल्ह्यात असलेल्या पीएफआयच्या कार्यालयांना देखील टाळे ठोकण्यात आले. मात्र त्यानंतर देखील एटीएसचे कारवाई सुरु असून नाशिकमधून पीएफआयच्या आणखी एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कोल्हापूर, औरंगाबादसह राज्यभरातून दहशतवादी कारवाया करण्याच्या संशयावरून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विराेधी पथकाने अटक केलेल्या पीएफआयच्या पाच संशयितांना अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर काल पुन्हा जळगाव जिल्ह्यातून एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या पीएफआय सदस्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यामुळे काही वेळात या सदस्याची कोठडीत रवानगी होण्याची शक्यता आहे.