सणबूर – राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांतून पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या, काही नळ पाणी पुरवठा योजना हया जीर्ण व कालबाह्य झालेल्या जवळपास 101 योजनांना जलजिवन मिशन योजनेअंतर्गत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी 29 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या सर्व कामांना आता गती मिळणार असल्याची माहिती सातारा जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हंटले आहे की, मंजूर नळ पाणीपुरवठा योजनांमध्ये नुने 115 लक्ष, पाळशी 14.94, कामरगाव 24.25, मानाईनगर 18.76, डोणीचावाडा (वांझोळे) 33, भारसाखळे 12.33, विठ्ठलवाडी (शिरळ) 9.90, जळव 24.96, सदुवर्पेवाडी 14.96, निगडे 24.05, चाळकेवाडी 18.64, पाडळोशी, तावरेवाडी, मसुगडेवाडी 43.10, पांढरेपाणी (आटोली) 99.28, गव्हाणवाडी 67.39, रुवले 55.78, ऊरुल 51.40, गलमेवाडी 83.37, चाफळ 163.26, काहिर 50.31, चव्हाणवाडी (धामणी) 14.97, लोटलेवाडी (काळगाव) 22.01, शिद्रुकवाडी (काढणे) 27.46, करपेवाडी (काळगाव) 48.46, मसुगडेवाडी दाढोली 29.86, मरळोशी 30.18, आंबवडे खुर्द 80.11, कडवे खुर्द रेडेवाडी 80.04, वाटोळे 14.30, मरळी 24.97, आंबळे 24.95, आवर्डे 21.56, कळकेवाडी 15.92, काटेवाडी तारळे 24.49, कुठरे 24.67, घोटील वरचे 24.68, जमदाडवाडी 21.09, तामकडे 24.07, तामकणे 24.90, नवजा कामरगाव 22.27, भुडकेवाडी 24.95, मिरगाव कामरगाव 24.96, वर्पेवाडी सळवे 18.86, वाघणे तळोशी 24.77,
शेडगेवाडी 24.10, निवडे पुनर्वसन 23.65, गोषटवाडी 40.82,मुरुड 42.41, सांगवड 40.43, आंबेघर तर्फ मरळी 27.17, जानुगडेवाडी 27.92, उधवणे 36.62, राहुडे 21.57, कोळेकरवाडी डेरवण 75.05, गवळीनगर (कोकीसरे) 20.58, बाचोली 39.96, बनपूरी 197.52, बोडकेवाडी 35.23, केमसे ढाणकल 5.90, चिटेघर 13.11, चौगुलेवाडी सांगवड 13.32, जरेवाडी 4.99, जाईचीवाडी बोंद्री 4.48, दिक्षी धावडे 11.19, मळा काढोली 14.47, मालदन 14.87, शेंडेवाडी 9.10, हावळेवाडी 7.56, आबदारवाडी 8.62, करपेवाडी तळमावले 8.74, सळवे 14.97, गोठणे 12.03, गोवारे 7.74, चोपदारवाडी 7.99, ढोकावळे नाव 8.21, पिंपळोशी 14.97, बनपेठवाडी 10.93, बोर्गेवाडी सळवे 13.01, सोनवडे 14.37, हुंबरवाडी 3.09, मुरुड गोरेवाडी 14.38, दुसाळे 13.56, पाबळवाडी 7.47, एकावडेवाडी सळवे 14.98, मराठवाडी दिवशी खुर्द 8, विठ्ठलवाडी सणबूर 14.89, दिवशी खुर्द 7.37, सिध्देश्वरनगर चोपदारवाडी 5.92, हुंबरणे 12.58, खिवशी 14.97, टेळेवाडी 14.92, नाव 4.24, मराठवाडी 9.60, घाणबी 13.97, तामिणे 12.74, साईकडे 197 लक्ष या योजना व त्यासाठीच्या निधींची तरतूद आहे. तसेच कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, अशा सूचना मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या असल्याचेही पत्रकांत नमूद केले आहे.