नेवासा (राजेंद्र वाघमारे) – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. देशभर “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा ‘गजर’ साजरा करण्यासाठी अल्ताफ शेख या युवकाने नेवासा फाटा ते अजमेर तिरंगा झेंडा फडकवत सायकल प्रवास करत बुधवार (दि.१०) रोजी पहाटे पाच वाजता रवाना झाला आहे.
तिरंगा झेंडा फडकवत नेवासा फाटा येथील युवक अल्ताफ शेख याने देशभक्तीची जाज्वल्य भावना मनी बाळगून स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा दिवस देशभर साजरा होणार आहे त्यामुळे आपणही थेट नेवासा फाटा ते अजमेर पर्यंत तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी सायकल प्रवास करत असल्याची प्रतिक्रिया शेख यांनी दिली.
शेख हा युवक ओमसाई सायकलिंग ग्रृपचा सदस्य असून त्याने यापुर्वी शिवनेरी,श्रीक्षेञ पंढरपूर,वणी,भद्रा मारुती, शेवगाव,गुजरात असा प्रवास केलेला आहे. आज बुधवारी अजमेरला रवाना झालेला युवक औरंगाबाद,कन्नड, चाळीसगांव मार्गे अजमेरकडे आगेकुच करणार असून पहिला मुक्काम दोनशे किलोमीटर अंतरावरील धुळे येथे करणार असल्याची माहीतीही यावेळी त्याने दिली.
नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकातून अल्ताफ शेख याने बुधवारी पहाटे पाच वाजता अजमेरकडे तिरंगा झेंडा फडकवत स्वार झाला यावेळी मिञ परिवारांकडून या दौऱ्याला सुभेच्छा दिल्या.