मुंबई – बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत आपल्या परफेक्शनसाठी ओळखली जाते. फॅशनसोबतच कंगना आपल्या कामाच्याबाबत नेहमीच सिरिअस असते. कंगना सध्या आपल्या अपकमिंग ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. तसेच कंगनाला डेंग्यूची लागण देखील झाली होती. तरीही कंगना सध्या या चित्रपटासाठी खूप मेहनत घेताना दिसतीय.
डेंग्यूने आजारी असूनही कंगनाने इमर्जन्सी चित्रपटाच्या सेटवर कामासाठी हजेरी लावल्याचे समजते. कंगनाच्या प्रॉडक्शन टीम मणिकर्णिका फिल्म्सने तिचा वर्कआउट करतानाचा एक फोटो शेअर केला आणि कंगनाचे अभिनंदन केले आहे. या फोटो कॅप्शनमध्ये टीम म्हणते”‘जेव्हा तुम्हाला डेंग्यूचा त्रास होतो, तेव्हा तुम्हाला खूप ताप येतो आणि पांढऱ्या रक्त पेशीही झपाट्याने कमी होत असतात.पण यानंतरही जेव्हा तुम्ही कामावर येतात तेव्हा ते पॅशन नसून वेडेपणा आहे. आमची प्रमुख कंगना राणौत अशीच एक प्रेरणा आहे”.असं टीमने आपल्या शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हंटले आहे.
कंगनाने देखील मणिकर्णिका फिल्मची पोस्ट पुन्हा शेअर करत लिहिले की,”शरीर आजारी आहे, आत्मा नाही. तुमच्या सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद.”कंगनाचा आगामी चित्रपट इंदिरा गांधींनी घोषित केलेल्या अंतर्गत आणीबाणीच्या स्थितीबद्दल आहे. या चित्रपटाचे संवाद रितेश शाह यांनी लिहिले आहेत,कंगनाच्या या चित्रपटाची झलक देखील प्रेक्षकांना टीजरच्या रूपाने पाहायला मिळाली आहे. ज्यात कंगना स्वतः इंदिरा गांधींची भूमिका करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.