केरळ – देशात करोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्याचसोबत आता मंकीपॉक्सचाही धोका वाढताना दिसून येत आहे. दुबईवरून आलेल्या केरळ येथील एका 35 वर्षीय तरुणाला या आजाराची लागण झाल्याचे समोर आले होते. आता दुसरा रुग्ण आढळून आल्याने केरळचे आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. केरळमधील कन्नूमर येथील 31 वर्षीय तरुणाला या आजाराची लागण झाली आहे. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती केरळचे आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी दिली आहे.
केरळमध्ये आढळून आलेल्या दोन्ही प्रकरणांचे परदेशाशी कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाले आहे. केरळमध्ये आढळून आलेला पहिला रुग्ण परदेशातून भारतात आला होता. त्यानंतर त्याला ताप आणि शरीरात वेदना सुरू झाल्या होत्या. आता दुसऱ्या प्रकरणातही परदेशवारीच कनेक्शन समोर आले आहे. संबंधित रुग्ण नुकताच दुबईहून भारतात परतला होता. भारतात परतून या व्यक्तीला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. पण त्याला आता मंकीपॉक्सची लक्षणे जाणवू लागली आहेत.
Ramnath Kovind : निवृत्तीनंतर सोनिया गांधींचे शेजारी होणार रामनाथ कोविंद; जाणून घ्या किती पेन्शन आणि काय सुविधा मिळतील?
मंकीपॉक्सची लक्षणे
तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा