नवी दिल्ली – भारतात 16व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज (दि. 18) मतदान सुरू आहे. एकूण 4800 निवडून आलेले खासदार आणि आमदार मदतान प्रक्रियेत सहभागी होत आहेत. निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांच्या विजयानंतर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर आदिवासी महिलेचा मुकूट पहिल्यांदाच विराजमान होणार आहे.
27 पक्षांच्या पाठिंब्याने द्रौपदी मुर्मू यांचा वरचष्मा आहे. त्याचवेळी, केवळ 14 पक्षांच्या पाठिंब्याने सिन्हा यांना केवळ 3.62 लाख मते मिळण्याची अपेक्षा आहे. निवडणूकीत मोठ्या प्रमाणात क्राॅस व्होटिंग होत असल्याची माहिती समोर येत आहे.
West Bengal CM Mamata Banerjee arrives at the State Assembly in Kolkata to cast her vote for the #PresidentialElections pic.twitter.com/iEo8uweSLy
— ANI (@ANI) July 18, 2022
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी विधानसभेत पोहोचल्या होत्या. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत पोहोचून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले आहे. त्यांसोबतच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी, शशी थरूर यांनीही संसदेत पोहोचून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.
Delhi | Congress MP Rahul Gandhi casts his vote for the Presidential elections pic.twitter.com/J9LE2hKmiQ
— ANI (@ANI) July 18, 2022