मुंबई – बॉलिवूडची धडक गर्ल जान्हवी कपूरला प्रवासाची खूप आवड आहे आणि ती नेहमीच तिच्या व्हेकेशनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करून चर्चेत राहते. पुन्हा एकदा जान्हवी कपूरने तिचे काही व्हेकेशन फोटो अपलोड केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर एका गार्डनमध्ये पांढऱ्या रंगाच्या फुल स्लीव्ह शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये बसून आनंद लुटताना दिसत आहे.
या फोटोंमध्ये जान्हवी कमीत कमी मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, जान्हवीच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहे.
जान्हवी कपूरने पांढऱ्या स्नीकर्ससह तिचा लूक पूर्ण केला आणि कॅमेऱ्यासमोर तिने एकापेक्षा एक पोझ दिल्या. एक फोटोमध्ये जान्हवी कपूर बोटीत बसून काही हावभाव करताना दिसत आहे. फोटोंमध्ये जान्हवी कपूरसोबत तिचे मित्रही दिसत आहेत, जान्हवीचे हे फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल झाले आहेत.