मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करोनाची लागण झाली आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
नाना पटोले यांनी यावेळी सांगितले की, ‘आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील.’ याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही करोनाची लागण झाली आहे.