नवी दिल्ली : आंध्रप्रदेशमध्ये काल रात्री एक भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. पलनाडू जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. एका ट्रकने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या लॉरीला जोरात धडक दिली आहे. या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
डीसीपी जयराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलनाडू जिल्ह्यात गंभीर अपघात झाला असून सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ट्रक आणि लॉरीमध्ये झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Andhra Pradesh | Six persons were killed and ten others injured in a road accident between a truck and a parked lorry in Palnadu district. The injured were shifted to Gurzala Government Hospital in Narasaraopet: Jayram, DSP, Gurjala pic.twitter.com/0bkopBQMrx
— ANI (@ANI) May 30, 2022
जखमींना उपचारासाठी नरसरावपेट येथील गुरजाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच बचावकार्याला सुरुवात केली होती. पोलिसांनी याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.