पिंपरी -लग्नाला जायचे असल्याने आईने आपल्या मुलाला मोटार आणण्यासाठी सांगितले. मुलाने मोटार आणल्याने वडिलाने मुलाला शिवीगाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) चिखली येथे घडली.
फिर्यादी व आरोपी पती-पत्नी आहेत. आरोपी हा वारंवार त्रास देत असल्याने तक्रारदार महिला यांनी यापूर्वी त्याच्याविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दोघे पती-पत्नी चिखलीमध्ये शेजारी-शेजारी वेगळे राहतात.
शुक्रवारी तक्रारदार महिलेने लग्नाला जायचे असल्याने त्यांच्या मुलाला चारचाकी वाहन घेण्यास सांगितले. तक्रारदार आणि आरोपी दोघेही या वाहनावर स्वतःचा दावा करत आहेत. मुलाने वाहन घेतल्याने आरोपी वडीलाने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तक्रारदार यांच्या राहत्या घराच्या बेडरुमच्या काचा व जाळी तोडली. पतीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.