पुणे – पै. अमोल बुचडे कुस्ती अकादमीचा धीरज लांडगे हा झारखंड येथे होत असलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. लांडगे याच्यासह या स्पर्धेसाठी निवड झालेल्या राज्याच्या सर्व कुस्तीगिरांचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने अभिनंदन केले आहे.
सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे येथे गेल्या आठवड्यात 15 वर्षांखालील मुली ग्रीको रोमन गटात मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धेची निवड चाचणी घेण्यात आली होती. यात तब्बल 370 कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. यातून निवड झालेले कुस्तीगीर येत्या 27 ते 29 मे या कालावधीत रांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
पै. अमोल बुचडे कुस्ती अकादमीचे निवड झालेले कुस्तीगीर –
15 वर्षांखालील ग्रीको रोमन मुले :- 1) – 38 किलो – ओंकार कराळे (ठाणे जिल्हा), 2) – 44 किलो – यश सरडे (सोलापूर) 3) – 52 किलो – प्रणय चौधरी (ठाणे जिल्हा) 4)- 62 किलो – धीरज लांडगे (पिंपरी-चिंचवड), 5) – 68 किलो – सोहम मोरे (सातारा), 6) – 85 किलो – हर्ष ठाकरे (ठाणे जिल्हा)