कोलकाता – सलामीवीर जोस बटलरने केलेल्या 89 धावांच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात मर्यादित 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा केल्या. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननेही वादळी फलंदाजी केली. मात्र, त्याचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल अपयशी ठरला. त्यानंतर मात्र यंदाच्या स्पर्धेत तीन शतकी खेळी केलेल्या व नंतरच्या काही सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या जोस बटलरने आपल्याला सूर गवसल्याचे सिद्ध करणारी खेळी केली. त्याने कर्णधार सॅमसनच्या साथीत डाव सावरला व संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
सॅमसनने 26 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली. सॅमसन परतल्यावर बटलरने देवदत्त पडीक्कलच्या साथीत संघाचे शतक फलकावर लावले. पडीक्कल चांगला खेळत असताना अनावश्यक फटका मारण्याच्या प्रयत्नात 28 धावांवर त्रिफळाबाद झाला. त्याने या खेळीत 20 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावले.
𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!@josbuttler‘s 89 & Captain @IamSanjuSamson‘s 47 power @rajasthanroyals to 188/6. 👏 👏
The @gujarat_titans chase to commence soon. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/O3T1ww9yVk#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/2JDqyDQSLX
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
दरम्यान, बटलरने आपले अर्धशतक पूर्ण करत शतकाकडे कूच केली. मात्र, तोपर्यंत षटके संपत आली होती व अखेर तो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अखेरच्या षटकात 89 धावांवर बाद झाला व त्याचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. त्याने आपल्या खेळीत 56 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व 2 षटकार अशी आतषबाजी केली. गुजरातकडून हार्दिक पंड्या, रवीश्रीनिवासन साई किशोर, महंमद शमी व यश दयाळ यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक :-
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 6 बाद 188 धावा. (जोस बटलर 89, संजू सॅमसन 47, देवदत्त पडीक्कल 28, हार्दिक पंड्या 1-14, रवीश्रीनिवासन साई किशोर 1-43, महंमद शमी 1-43, यश दयाळ 1-46).