तब्बल 35 फूट लांब डायनासोर होता भयानक शिकारी
ब्युनोस आयर्स : अर्जेंटिनातील एका प्रदेशात रॅपटर डायनासोरचे अवशेष सापडले आहेत. तब्बल 35 फूट लांबीचा हा रेक्टर डायनासोर हा अत्यंत खतरनाक आणि भयानक शिकारी प्राणी म्हणून ओळखला जात. असे काय हे अवशेष 7 कोटी वर्षापूर्वीचे असून या डायनासोरचे वजन तब्बल पाच टन असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जगाच्या कानाकोपऱ्यात ठीकठिकाणी जे डायनासोरचे अवशेष सापडतात त्यामध्ये रॅपटर डायनासोरचे आत्तापर्यंत सापडलेले अवशेषपैकी हा सर्वात मोठा अवशेष मानला जात आहे. राजधानी शहरापासून 2698 किलोमीटर दूर अंतरावरील कालाफॅट नावाच्या गावांमध्ये हे अवशेष सापडले आहेत.
या अवशेषांमध्ये सापडलेल्या हाडांचे विश्लेषण केल्यानंतर या डायनासोरची लांबी 31 ते 35 फूट असावी आणि या डायनोसरचे वजन गेंड्याच्या दुप्पट म्हणजेच पाच टन असावे असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
उत्खननाबाबत लेख मोरो ओलांडो या संशोधकांनी लिहिला असून डायनोसर दोन पायावर चालत असे आणि त्याच्या पाठीचा कणा ताठ असल्यामुळे तो जोरात पळू शकत असे असे त्यांनी म्हटले आहे. अणकुचीदार आणि लांब नखे हे या डायनोसॉरचे वैशिष्ट्य होते आणि शिकार करताना याच नखांचा वापर हे डायनासोर करत असत सापडलेल्या हाडांचा अभ्यास केला असता या डायनासोरची नखे तब्बल 40 सेंटीमीटर लांब असल्याचे आढळून आले.