मुंबई : राज्य सरकारचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर त्यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्दावरून सडकून टीका केली आहे. त्यांनी पूर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परीसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते. यावेळी राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत असल्याचा घणाघात यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. तसेच भाजपच्या इतक्या सीडी लावल्या की त्यांच्यामागे ईडी लागली असेही धनंजय मुंडे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असा विश्वासदेखील यावेळी मुंडे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे 100 च्या वर आमदार येतील, फक्त जयंत पाटील साहेब आपल्या टप्यात निवडणूक घ्यावी असेही मुंडे यावेळी म्हणाले.
अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत.
राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार.
Get Well Soon धनंजय मुंडे— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 20, 2022
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या टिकेला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ‘अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार. Get Well Soon धनंजय मुंडे असे ट्वीट करत अमेय खोपकर यांनी निशाणा साधला.