लंडन – स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या पोर्तुगाल संघाने नॉर्थ मॅसेडोनियावर 2-0 असा विजय मिळवला. यासह संघाने आगामी फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
रोनाल्डो कारकिर्दीतील पाचवी विश्वकरंडक स्पर्धा खेळणार आहे. पोर्तुगाल एकूण आठव्या आणि सलग सहाव्यांदा विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होणार आहे. पात्रता स्पर्धेतील सामन्यात नॉर्थ मॅसेडोनिया संघाला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या लढतीत बलाढ्य इटलीला 2-0 असे पराभूत केले होते. त्यामुळे इटली सलग दुसऱ्यांदा विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला.
दोन गोल करणारा ब्रुनो फर्नांडिस हा पोर्तुगालच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने दोन्ही हाफमध्ये एकेक गोल केले. अन्य पात्रता फेरीच्या सामन्यात पेरूने पॅराग्वेला 2-0 असे पराभूत केले.