Urvashi Rautela – 19 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या ICC विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघासोबतच करोडो देशवासीयांची निराशा झाली. यानंतर सोशल मीडियावर दिसणारी झलक पाहता जगभरातून ऑस्ट्रेलियन संघाचे कौतुक होत आहे.
View this post on Instagram
ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू मिचेल मार्शच्या विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवताना दिसले आणि हे पाहून सर्वांचेच रक्त उकळले. आता या घटनेमुळे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाही संतापली असून तिने अनेक फोटो शेअर करून ऑस्ट्रेलियन संघाला सल्ला दिला आहे. मात्र, येथे अनेक लोक उर्वशीलाच ट्रोल करत आहेत.
सामना जिंकल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्श विश्वचषक ट्रॉफीवर आपले दोन्ही पाय ठेवताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो चुकूनही लीक झाला नसून कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने तो औपचारिकपणे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.
उर्वशीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. पहिल्या फोटो उर्वशी ट्रॉफीला किस करतांना दिसत आहे, तर त्याच्या खाली ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू मिचेल मार्श ट्रॉफीवर पाय ठेवताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत उर्वशीने ट्रॉफीचे अनावरण करताना काही वृत्ताचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये मिचेल मार्श क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवताना दिसत आहे, आणि चौथ्या फोटोमध्ये कपिल देव डोक्यावर ट्रॉफी घेऊन दिसत आहे,. एका फोटोमध्ये फुटबॉल स्टार ट्रॉफी घेऊन झोपलेला दिसत आहे.
मात्र, अनेकांनी उर्वशीलाच ट्रोल केले आहे. एकाने लिहिले, ‘तुम्ही ट्रॉफीचे किस घेण्यासाठी तू पैसे घेतले मात्र तीच ट्रॉफी त्यांनी मेहनतीतून मिळवली.’ असं म्हणत अनेक युजर्सने तिला चांगलेच ट्रोल केले आहे.