वंदना बर्वे
नवी दिल्ली – वाढत्या इंधन दरामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिला…उच्च शिक्षणपासून वंचित महिला… अत्त्याचार ग्रस्त मुली…. स्वहक्कसाठी आग्रही महिलांवर्ग…वाढती महागाईला कंटाळलेली गृहिणी अशा सर्वच स्तरातील महिला वर्गाने उत्तर प्रदेशात जोशात मतदानाचा हक्क बजावला हे विशेष.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या महायज्ञामध्ये आता शेवटच्या टप्प्यातील आहुती आज 54 मतदारसंघांमध्ये मतदानाची आहुती दिली गेली आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. त्यामुळेच यूपीमध्ये महिला मतदानामध्ये आघाडीवर राहिल्या. सर्वच टप्प्यांत मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांची संख्या मोठी ठरली. त्यामुळे महिला मतदारांचा हा वाढता आकडा यंदा निर्णायक ठरण्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांच्या मते 2014 पासून महिलांमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावण्याबाबतची प्रचंड जनजागृती झाली आहे. मात्र, त्यामानाने पुरुषांची संख्या घटली. पुुरुष मतदारांमध्ये प्रचंड निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उत्तर प्रदेश मध्ये नवीन सरकार निवडून येण्यात महिला मतदाराचे मोलाचे योगदान असणार आहे.