मुंबई – रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले असून या हल्ल्यात युक्रेनचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. तर सैनिकांसह, नागरिक सुद्धा ठार झाल़ आहेत. आता या युद्धाचे अनेक धडकी भरविणारे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केल्यानंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतातील नागरिक सुद्धा सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करत आहेत. अश्यातच, मराठी कलाकारांनी सुद्धा या संपूर्ण घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. ‘युद्ध नकोच, बुद्ध हवा’, असं म्हणत या कलाकारांनी शांततेचं आवाहन केलं आहे. हतबल झालेल्या युक्रेनमधील नागरिकांचे फोटो, व्हिडीओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
भिजीत केळकर, रसिका सुनील, विजू माने यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘माणुसकीसाठी प्रार्थना करत आहे’, अशी पोस्ट अभिनेत्री रसिका सुनीलने लिहिली आहे. तर अभिजीत केळकरने ‘नको युद्ध, हवा बुद्ध’ अशी पोस्ट लिहिली आहे.