मुंबई : अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार इस्रायलने डिफेंड डील अंतर्गत भारताला गुप्तचर सॉफ्टवेअर पेगॅसस विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने २०१७ मध्येच क्षेपणास्त्र प्रणालीसह शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी २ अब्ज डॉलर (१५ हजार कोटी) किमतीच्या संरक्षण करारात इस्रायली पेगॅसस स्पायवेअर खरेदी केले होते. या मुद्द्यावरून देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिवसनेनेही याप्रकरणी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
India bought Pegasus as part of defence deal with Israel in 2017: NYT.
A spyware used not for defence purposes but to snoop on opposition and journalists.
भाजपा है तो मुमकिन है, देश को बिग बॉस का शो बना डाला है। https://t.co/kQDEf413lS— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) January 29, 2022
शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदींनी पेगॅससवरुन भाजपाचे सरकार असेल तर हे शक्य आहे असे म्हटले आहे. “भारताने २०१७ मध्ये इस्रायलशी संरक्षण कराराचा भाग म्हणून पेगॅसस खरेदी केले. स्पायवेअरचा वापर संरक्षण उद्देशांसाठी नाही तर विरोधक आणि पत्रकारांची हेरगिरी करण्यासाठी केला जातो. भाजपा असेल तर शक्य आहे. देशाला बिग बॉसचा कार्यक्रम बनवून ठेवला आहे,” असे प्रियंका चतुर्वेदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. “मोदी सरकारने भारताच्या शत्रूंसारखे का वागले आणि भारतीय नागरिकांविरुद्ध युद्धाची शस्त्रे का वापरली? पेगॅससचा वापर करून बेकायदेशीर हेरगिरी करणे हा देशद्रोह आहे. कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही आणि आम्ही न्याय मिळेल याची खात्री करू,” असे खर्गे यांनी म्हटले आहे.