बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिची जबरदस्त फिल्मी इनिंग खेळल्यानंतर आता डिजिटल जगात पाऊल ठेवत आहे. माधुरीच्या ‘द फेम गेम’ या वेबसिरीजचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. द फेम गेम 25 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केली जाणार आहे.
Ajnabi si hai uski duniya. Ankahi si hai uski kahani. Par ab woh aa rahi hai apni kahani lekar duniya ke samne. ‘The Fame Game’ series premieres 25th February, only on Netflix! pic.twitter.com/3jggUg2l7v
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) January 27, 2022
माधुरीच्या ‘द फेम गेम’ वेबसिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीची कथा आहे, जिचे आयुष्य तिच्या चाहत्यांना परफेक्ट दिसते पण तिच्या आयुष्यात अनेक काळी सत्ये आहेत. बॉलिवूडची सर्वात मोठी स्टार अनामिका आनंदच्या जीवनाचे सत्य लवकरच जाणाल’ असे म्हटले आहे. माधुरीनेही पोस्टर शेअर करत ‘तिच जग अनोळखी आहे. ती आता स्वतःची कहाणी जगासमोर घेऊन येतेय’ असे नमूद केले आहे. सस्पेंसने भरलेली ही सीरिज चाहत्यांची उत्सुकता वाढविणारी आहे.
दिग्दर्शन बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांनी केले आहे. या सीरिजमध्ये माधुरीसह संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुळे, लक्ष्यवीर सरन हे दिसून येणार आहेत.