नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी लिहिले आहे की, जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी त्यांची चाचणी करून घेतली पाहिजे. या ट्विटनंतर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब-चंदीगडमध्ये झालेल्या रॅलीचे फोटो शेअर करताना लोक लिहित आहेत की- ‘Those who come in touch’
मास्क न लावता दिसत आहेत केजरीवाल
ट्विटरवर जी छायाचित्रे शेअर केली जात आहेत ती सीएम केजरीवाल यांच्या एक-दोन दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये झालेल्या रॅलीची आहेत. यामध्ये ते मास्क न लावलेले दिसत आहेत. लोक विनोद करत लिहित आहेत की मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे की त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी, परंतु छायाचित्रांमध्ये पाहिले तर हजारोंच्या गर्दीत मुख्यमंत्री मास्कशिवाय दिसत आहेत.
दरम्यान, केजरीवाल यांना करोनाची सौम्य लक्षणे आहेत. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला घरात क्वारंटाइन केले असून ते घरीर डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार उपचार घेत आहेत.