सोलापूर – भाजपचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांच्यावर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. शिवीगाळ, खंडणीसारखे विविध गुन्हे काळे यांच्यावर आहे. आज सोलापूर पोलिसांना त्यांना दोन वर्षासाठी तडीपार घोषीत केले आहे. काळे यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे सोलापूरातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
काळे यांच्यावर विविध गुन्हे दाखल असून त्यांना दोन वर्षासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले असल्याचे सोलापूर शहर पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी सांगितले माहिती देताना सांगितले आहे. तर सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढले आहेत.
काळे यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत नियमबाह्य पद्धतीने काम करण्यसाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरिक आणि व्यवसायिकांना धमकावून पैशाची मागणे करणे, शासकीय अधिकारी व सामान्य नागरिकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, शासकीय कर्मचारी काम करत असातना सुद्धा धाकदपटशा दाखवण्याच्या उद्देशाने त्याने सरकारी काम करु नये यासाठी अंगावर जाणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या राजेश काळे याला सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली आहे.