मुंबई – दक्षिण भारतातील सुपरस्टार अल्लू अर्जुनाचा आगामी ‘पुष्पा द राइज’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असून, नुकतंच ‘पुष्पा द राइज’चा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आहे.
अभिनेता अजय देवगण याने या सिनेमाचा हिंदी ट्रेलर रिलीज केला. यामध्ये दक्षिणेतील हिट हिरो अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे लीड रोलमध्ये दिसून येत आहेत. तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला मराठमोळ्या कलाकाराने आपला आवाज दिला आहे.
View this post on Instagram
हिंदी ट्रेलरला मराठमोळा अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ने आपला आवाज दिला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. “भारतातील अतिशय लोकप्रिय आणि स्टायलिश अभिनेत्याला आवाज देताना मला प्रचंड आनंद झाला आहे. असं तो म्हणाला.
‘पुष्पा द राइज’ दाक्षिणात्य सिनेमा असला तरी हा एक पॅन इंडिया फिल्म असणार आहे. त्यामुळे तेलगू बरोबर हिंदीतही रिलीज होणार आहे. या सिनेमाचे दोन भाग असणार आहेत.
‘पुष्पा पार्ट 1- द राइज’ येत्या 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चंदनाच्या लाकडांच्या तस्करीच्या कथेवर या सिनेमाची कथा आधारलेली असणार आहे. आंध्र प्रदेशातील सेशाचलम जंगलात ही कथा घडते आहे.