मुंबई – मराठी अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ हिने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाउंटवर “मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही, बॅन लिपस्टिक’ असं म्हणतं एक व्हिडिओ शेअर केला होता.
तेजस्विनी पाठोपाठ अभिनेत्री प्राजक्ता माळी, सोनाली खरे यांनी सुद्धा तिला पाठिंबा देत अश्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करत ‘बॅन लिपस्टिक’ असं म्हंटलं आहे.
View this post on Instagram
#BanLipstick या शेअर केलेल्या व्हिडिओमुळे बॉलिवूड कलाकारांसोबत चाहते देखील गोंधळात पडले होते. मात्र, आता #BanLipstick चा खुलासा झाला असून तेजस्विनी लवकरच एका वेबसिरीजमधून चाहत्यांच्या भेटीस येत असल्याचं समजतंय.
View this post on Instagram
स्वतः तेजस्विनीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. “सध्या चर्चेत असलेलं #BanLipstick नक्की काय आहे? त्याचंच उत्तर यात दडलंय. ‘अनुराधा’ येतेय…” असं तेजस्विनीने म्हंटलं आहे. ही वेब सिरीज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.