न्यूयॉर्क : हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार हिंदू धर्म ९० हजार वर्षे जुना आहे. हिंदू धर्माच्या विचारांनी प्रभावित होऊन जगभरातील सेलिब्रिटी त्याचा अवलंब करत आहेत. उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. यापूर्वी इंडोनेशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची मुलगी सुकमावती सुकर्णोपुत्री हिने हिंदू धर्म स्वीकारला होता. ७० वर्षीय सुकमावती यांनी इस्लाम सोडला आणि हिंदू धर्म स्वीकारला. काय असावे यामागील कारण? कोणकोणत्या दिग्गजांनी हिंदू धर्म स्वीकारला? चला, जाणून घेऊया.
* नयनतारा
ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेली साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा हिने 2017 मध्ये हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी नयनताराने चेन्नईतील आर्य समाज मंदिरात दीक्षा घेतली. 18 नोव्हेंबर 1984 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेल्या नयनताराने आपल्या करिअरची सुरुवात मल्याळम चित्रपट ‘मनसिंकरे’मधून केली होती.
* ज्युलिया रॉबर्ट्स
हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्स हिने 2010 मध्ये हिंदू धर्म स्वीकारला. अमेरिकेत जन्मलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने भारतात एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हिंदू धर्माचा स्वीकार केला.
* जॉन
ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या अमेरिकन संगीतकार जॉनवर हिंदू धर्माचा खूप प्रभाव होता. त्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. त्यांनी अनेक प्रसंगी स्वतःला हिंदू म्हणवून घेतले आहे.
* ट्रेव्हर
अमेरिकन गायक ट्रेव्हर २०१३ मध्ये भारतात आले होते. या काळात त्यांच्यावर हिंदू धर्माचा खूप प्रभाव पडला आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. ट्रेव्हरच्या संगीतावरही हिंदू धर्माचा प्रभाव आहे. ते आपल्या गाण्यात संस्कृतचा वापर करतात.
* एलिझाबेथ गिल्बर्ट
लेखिका एलिझाबेथ गिल्बर्ट यांच्यावर हिंदू धर्माचा खूप प्रभाव होता आणि त्यानंतर त्यांनी तो स्वीकारला. ती भारताच्या दौऱ्यावर आली होती आणि याच दरम्यान तिने हिंदू धर्म स्वीकारला.
* रसेल ब्रँड
कॉमेडियन रसेल ब्रँड यांनीदेखील हिंदू धर्माचा स्वीकार केला. 2010 मध्ये त्यांनी हिंदू परंपरेनुसार लग्न केले. रसेल ब्रँड हिंदू धर्माबद्दल प्रवचन देतात.
* वैष्णव संत हरिदास
बंगालमधील प्रसिद्ध वैष्णव संत हरिदास यांनी चैतन्य महाप्रभूंकडून वैष्णव धर्माची दीक्षा घेतली. मुस्लिम काझीच्या कुटुंबात जन्मलेल्या संत हरिदास यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता, त्यानंतर त्यांना फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. मात्र यामुळे ते खचले नाही.
* महंत गुलाबनाथ
योगी आदित्यनाथ आणि त्यांचे गुरु महंत अवैद्यनाथ यांना नाथ संप्रदायातील प्रसिद्ध संत महंत गुलाबनाथ यांच्याबद्दल खूप आदर होता. मूळ गुल मुहम्मद नावाचे हे मुस्लिम संत नंतर हिंदू धर्म स्वीकारून गुलाबनाथ झाले.