पुणे -इयत्ता पाचवी व आठवीसाठी येत्या 20 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. याची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अधिसूचना जारी झाली असून ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नियमित शुल्कासह शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. 31 डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज भरता येणार नाहीत. यंदाच्या परीक्षेसाठी प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
पाचवी, आठवीच्या परीक्षेसाठी बिगरमागास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश व परीक्षा शुल्क असे एकुण 200 रुपये, तर मागास, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 125 रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे. शाळा संलग्नता शुल्क प्रतिवर्ष 200 रुपये भरावे लागणार आहे.